स्त्रिया... स्त्रियांच्या समस्या... स्त्रियांचे हक्क... स्त्रियांचे शोषण आणि स्त्रियांचे सक्षमीकरण या संबंधात समाजात आतापर्यंत
अनेक गोष्टी गोष्टी घडल्या आहेत, घडत आहेत. स्त्री पुरुष समानता, स्त्रियांचे हक्क या विषयक कायदे लागू झाले पण स्त्री पुरुष समानता आणि पुरुष समानता आणि
स्त्री हक्कांविषयी ची जाणीव घराघरांमध्ये खरंच रुजली का याचं उत्तर अजूनही नाही असंच द्यावं लागेल द्यावं लागेल. पण एखाद्या घरी एखाद्या स्त्रीच्या हक्काविषयी खरचच चर्चा सुरू झाली किंव्हा त्या संबंधातील लोकांनी आपल्या
मानसिकतेत बदल घडवून आणण्यास सुरुवात केली तर काय होईल? आणि जे होईल ते थोडं खेळकर हलक्याफुलक्या
पद्धतीने मांडलं तर अर्थातच 'दादा एक गुड न्यूज आहे' यासारख सखोल विषय, व्यवसायिक गणित संभाळून मांडणारं
एक दर्जेदार नाटक प्रेक्षकांसमोर येत. विनीत नावाचा एक तिशीतला तरुण आपलं घर सोडून नोकरीच्या निमित्ताने एका शहरात राहतोय. विनीत ची
लहान बहीण आहे नमिता. तिचं वय अवघे वीस वर्षे. विनीत आणि नमिता दोघा भावा-बहिणींचे एकमेकांवर अगदी
जीवापाड प्रेम आहे. विनीत नोकरी सांभाळून सीएच्या परीक्षेची तयारी करत, कॅलिफोर्नियाला नोकरीच्या निमित्ताने
जाण्याची स्वप्न पाहतोय. विनीत ची बहिण नमिता ही आपल्या आई-बाबांच्या कडे राहते पण आपल्या दादाच्या घराशी जास्त attached आहे. तर विनितच्या घरी एका घाईगडबडीच्या दिवशी त्याची लहान बहीण नमिता ऊर्फ मन्या येते आणि आपण प्रेग्नंट आहोत
अशी न्यूज दादाला देते. कॉलेजमध्ये प्रोजेक्टच्या निमित्ताने कॉलेजमधील एका मुलाबरोबर संबंध आलेले होते व त्यातून
हा प्रकार घडला असे ती सांगते. मोठा भाऊ विनीत या प्रिमॅरिटल सेक्सच्या प्रकरणातून मार्ग काढण्याच्या दृष्टीने गायनॅक ची
अपॉइंटमेंट घेतो व इथेच नमिता आपण abortion च्या निर्णयाचा पुनर्विचार करत आहोत असे जाहीर करते. येणारे मूल
जन्माला घालायचे की नाही हा हक्क तिचा आहे आणि या संबंधातील लोकांनी या हक्काचा आदर करायला हवा
अशी भूमिका ती घेते. यानंतर प्रेमळ आणि सेन्सिबल पुरुष असणारा विनीत नेमकी काय भूमिका घेतो, बहिण-भावाचं नातं नेमकं कुठल्या
वेगवेगळ्या टप्प्यांवरुन जातं याचा प्रवास म्हणजे दादा एक गुड न्यूज आहे. विनीत आणि नमिताच, भावा-बहिणीचं नातं हे
खरंतर या नाटकाचा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही. व्यवसायिक काय पण प्रायोगिक रंगभूमीवर ही या नात्याच्या
तशा कमीच बघायला मिळाल्या आहेत. यासाठी विशेष कौतुक करायला हवं ते लेखिका कल्याणी पाठारे चं. लेखिकेने या नात्यातल्या हळुवार छटा अगदी लीलया
मांडल्या आहेत. नमिताने प्रसंगी विनीत ची आई होणं, विनीतनही टिपिकल बाप न होता एक सहृदय पुरुष म्हणून नमिताच्या
आयुष्याकडे बघण अशा अनेक गोष्टी लेखिकेने अनेक प्रसंगातून अगदी मस्त उभ्या केल्या आहेत. विनीत च्या भूमिकेत उमेश कदम व नमिता च्या भूमिकेत ऋता दुर्गुळे या दोघांनीही या नात्याचा ग्राफ अगदी उत्कृष्टरित्या
पेलून धरला आहे. बहिणीच्या प्रेमापोटी, तिच्या निर्णयासाठी ठामपणे समाजाविरुद्ध उभे राहण्याचा, एक काळजी करणाऱ्या
भावापासून ते एका सेन्सिबल पुरुष होण्याचा विनीत चा प्रवास उमेश कामत ने अगदी बारकाईने रंगवला आहे. नमिता च्या भूमिकेत असणाऱ्या ऋता दुरगुळे चे कौतुक करावं तितकं कमीच आहे. विसाव्या वर्षी आपल्या हातून सहजच
घडलेल्या काही गोष्टींपासून ते आपल्या निर्णयाची जबाबदारी आपण स्वतः घेणाऱ्या स्त्रीचा ग्राफ ती अगदी उत्कृष्टरित्या मांडते.
एक अभिनेत्री म्हणून नमिताच्या प्रवासातल्या अनेक सटल गोष्टी ती रंगमंचावर उभ्या करते. या दोघांच्या जोडीला नमिताचा मित्र बॉबी व विनीत ची मैत्रिण मिथिला ही पात्र ही योग्य बॅलन्स साधतात. बॉबी च्या भूमिकेत
ऋषी मनोहर हा आपल्या इनोसन्स ने एक छान सटल ह्युमर घेऊन येतो.विनीत तिच्यावरचं प्रेम व्यक्त ठेवून त्यासाठी झुरणारी
मिथिला अर्चना मोरे हिने छान उभी केली आहे. नाही म्हणायला नमिताच्या भावनांना अत्यंत सहृदयतेने समजून घेणारा विनीत आपल्या मैत्रिणीच्या, मिथिलाच्या भावनांना
का नीट समजून घेऊ शकत नाही ही गोष्ट मात्र काहीशी खटकते. कथा, संवाद, पात्र, वेशभूषा, नेपथ्य, याची योग्य सांगड घालत आद्वैत दादरकर चे दिग्दर्शन अगदी effortlessly हे नाटक
आपल्यासमोर मांडते. परिक्षण: असीम त्रिभुवन (लिखाण खास मिलेनिअल मराठी साठी) या परिक्षणाचा विडिओ...
