परभन्ना फाउंडेशनने ' नॅशनल टूरिझम डे ' आणि ' वर्ल्ड टुरिझम डे ' यांच्या पार्श्वभुमिवर यावर्षीही नॅशनल टूरिझम शॉर्टफिल्म फेस्टिवलचे ( NTSFF) आयोजन २७ सप्टेंबर २०२३ रोजी केले आहे. गेल्यावर्षी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. विविध स्थळांची माहिती समाजासमोर घेऊन येणे, पर्यटन क्षेत्राला आर्थिक चालना देणे व पर्यटन क्षेत्रात रोजगारनिर्मितीमध्ये वाढ करणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे.
गणेश चपलवार ( Festival Director) यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम निर्माण झाला आहे व यावर्षी मीडिया पार्टनर म्हणून Natives Communications महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. याशिवाय या महोत्सवासाठी असीम त्रिभुवन (मॅनेजिंग डायरेक्टर), अनिकेत साळुंके (Committee Coordinator) NTSFF Organising Committee चे सदस्य व या फेस्टिवलचा एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम पाहत आहेत. या शिवाय K Abhijit, Head Of Media म्हणून, मोना देठे या Head Of Advisory Committee म्हणुन या महोत्सवाची जबाबदारी पाहत आहेत.
या फेस्टिवलच्या माध्यमातून सरकार, विविध संस्था, आयोजक, विदयार्थी- महाविद्यायालये, पर्यटन व्यवसाय करणारे विविध व्यावसायीक आणि प्रवासी यांना एकत्रित आणण्याचा उद्देश आहे. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून पर्यटना संबंधित कलाकारांनी बनवलेल्या नवनवीन कलाकृती सामान्य नागरिकांपर्यंत पोहचणार आहेत.
खालील लिंक वर क्लिक करून तुम्हीही या स्पर्धेत भाग घेऊ शकता…
https://forms.gle/K3iXEGtLr8ca1ixG6
अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री. गणेश चपलवार
(फेस्टिवल डायरेक्टर)
९७३०४६४३२७
