दि. २८, जून, 2023 रोजी, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री. राजेश पांडे आणि मराठी चित्रपट महामंडळ व बालगंधर्व परिवार अध्यक्ष श्री. मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते डॉ. अमित त्रिभुवन यांना बालगंधर्व रंगमंदिर येथे , "बालगंधर्व पुरस्कार" ने गौरवण्यात आले. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. अमित म्हणाले की ,"निवेदकाचे शब्द खरंतर वा-यावर विरून जाणारे असतात . हा सन्मान माझा नाही तर या कलेचा , शब्दाचा व शब्दसेवेचा आपण सन्मान करत आहात. ज्या रंगमंचावरून माझ्या कामाला सुरूवात झाली तिथेच आणि बालगंधर्वांच्या नावाने असलेला हा पुरस्कार स्वीकारताना मला मनस्वी आनंद वाटत आहे. रसिकांचे व बालगंधर्व परिवाराचे मी मनापासून आभार मानतो."
डॉ. अमित गेली २७ वर्षे निवेदक, अभिनेता, कवी, व्हाॅईस ओव्हर आर्टिस्ट अशा विविध भूमिकेतून रेडीयो, टेलिविजन, फिल्म क्षेत्रात कार्यरत आहेत. देशात, परदेशात, तिन्ही भाषांतून विविध कार्यक्रमांचे ओघवत्या शैलीत निवेदन करत आपल्या स्वच्छ , मधुर वाणी , भारदस्त आवाज आणि मिश्कील हजरजबाबीपणा द्वारे त्यांनी रसिकांच्या मनात आपले स्वत:चे असे स्थान निर्माण केले आहे. हे करतानाच मंचावरून योग्य वेळी समर्पक असा योग्य संदेश देत प्रबोधन करणं ही त्यांची खास हातोटी आहे. महानायक अमिताभ बच्चन, यश चोप्रा, नसिरुद्दीन शहा,आनंदजीभाई, शरद पवार साहेब, देवेंद्र फडणवीसजी , श्री श्री रविशंकर , डॉ. श्रीपाल सबनीस आणि अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी उत्तम कार्यक्रम सादर केले आहेत आणि त्यांच्याकडून दाद ही मिळवली आहे. गेल्या २७ वर्षात हजारो कार्यक्रमाचे निवेदन, सुमारे ६ हजाराहून अधिक रेडियो - TV जाहिराती, ४ हजारापेक्षा जास्त माहितीपट व corporate films, National award winning documentary साठी आवाज अशा सातत्यपूर्ण कलासेवेचा यथोचित सन्मान बालगंधर्व परिवार समितीने केला.


